गोव्याला फिरायला जाण्याचा बेत आखण्यापूर्वी जाणून घ्या नियमवाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशात सर्वच राज्यात कोरोनाने हातपाय पसरले आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या अचानक वाढत असल्याचे सांगून गोवा सरकारने 21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.

रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही हालचाली किंवा लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. नवीन नियमांनुसार डेस्टीनेशन वेडिंगसाठी जाणाऱ्यांनी पुढील नियम लक्षात घ्यावे.

विवाह सोहळ्यासाठी 50 लोक उपस्तिथ राहू शकतात. तसेच अंत्यविधी साठी 20 लोक उपस्तिथ राहू शकतात. कसिनो, पंचतारांकित हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या पर्यटकांच्या आवडीची ठिकाणे चालूच राहतील परंतु केवळ अर्ध्या क्षमतेवर.

रात्री दहाच्या अगोदर, या आस्थापनांना त्यांच्या जागेवर सुरु ठेवण्याची परवानगी असेल. परंतू,सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर गर्दी करण्यास बंदी आहे. तसेच समुद्रकिनार्‍यावर पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे.

दरम्यान कठोर नियमांची अंमलबजावणी करत असताना गोव्यातील दुकाने, मॉल्स, केमिस्ट, ही आस्थापने दररोज खुल्या राहतील आणि किराणा सामान खरेदी किंवा घाऊक साठा करण्याची आवश्यकता नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|