नालेगावातील अमरधाम पाठोपाठ आता ‘या’ ठिकाणी अंत्यविधी पार पडणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यासह शहरात वाढत्या करोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

जिल्हाभरातून करोना उपचारासाठी रूग्ण नगर शहरात येतात. नगरमध्ये जिल्हा रूग्णालयासह मोठमोठी खाजगी रूग्णालय आहे.

उपचारादरम्यान करोना रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर जवळच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

यातच दरदिवशी करोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे.यामुळे नालेगाव अमरधामवर ताण आला आहे.

त्यामुळे आता नालेगाव बरोबरच केडगाव व नवनागापूर येथील अमरधाममध्ये करोना मृत रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

दरम्यान जिल्हा रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात मृत झालेल्या करोना रूग्णांवर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जात आहे.

नालेगाव अमरधाम परिसरात नागरी वस्त्या आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कारामुळे धुराचे लोट निघत असून यामुळे नागरी भागात राहणार्‍या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

त्यामुळे करोना रूग्णांचे अंत्यसंस्कार स्थानिक गावात करावेत, अथवा शहराच्या बाहेर करावे, अशी मागणी आमदार संग्राम जगतापांनी केली होती.

मात्र ते शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले. त्यामुळे आता नालेगाव बरोबरच केडगाव, नवनागापूर येथील अमरधाममध्येही करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

15 एकरच्या भूखंडावर अंत्यसंस्कार करण्याची चाचपणी सुरू याशिवाय महापालिकेचा सावेडी उपनगरातील 15 एकरच्या भूखंडावर अंत्यसंस्कार करण्याची चाचपणी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

गुरूवारपर्यंत त्याठिकाणी अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|