Breaking News Updates Of Ahmednagar

संपूर्ण कुटुंबीय कोरोना संकटात, मंत्री गडाख म्हणाले दिखाऊपणा मला जमत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव घेतल्यामुळे अनेक राजकारणी घरातच बसले आहेत.

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख मात्र कोरोना रुग्णंचे जीव वाचवण्यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता प्राणदूताच्या भूमिकेत पुन्हा मैदानात उतरले आहेत.

Advertisement

कुटुंबीय कोरोनाशी संघर्ष करत असताना मंत्री गडाख अतिशय धोकादायक काळात समाजाचे रक्षणकर्ते बनले आहेत.राजकीय, सहकार, सांस्कृतिक, तसेच साहित्य क्षेत्रात अग्रेसर अशी गडाख कुटुंबाची ओळख आहे.

मंत्री शंकररावांचे वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नुकतीच कोरोनावर मात केली. अजून ते पुण्यातील हॉस्पिटलमध्येच आहेत. शंकररावांचे धाकटे बंधू प्रशांतही कोरोनाशी संघर्ष करत उपचार घेत आहेत.

Advertisement

त्यांना नगरला बेड मिळाला नाही. त्यामुळे ऑक्सिजन लावून मुंबईला नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. संपूर्ण गडाख कुटुंबीय कोरोना संकटात सापडले, पण ते डगमगले नाहीत. मंत्री शंकररावांना दोनदा बाधा झाली, पण त्यांनी कोरोनावर विजय मिळवला.

आता जनतेचे जीव वाचवावेत, म्हणून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शंकरराव स्वत:चे व घरचे दु:ख बाजूला सारून दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी लढत आहेत. नेवासे तालुक्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध व्हावीत,

Advertisement

तसेच आरोग्य यंत्रणा, खासगी डॉक्टर्स, महसूल, पोलिस व कोविड सेंटर यांच्यातील समन्वयासाठी बैठकांचा धडाका मंत्री गडाख यांनी लावला आहे. तालुक्यातील कोविड संेटरला ते दररोज भेटी देत मदत करताना दिसत आहेत.

मंत्री गडाखांचा हा लढा राज्यातील इतर मंत्र्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हातासही कळू न देणे हेच खरे दातृत्व असते.

Advertisement

दिखाऊपणा मला जमत नाही. ही आपली जबाबदारीच आहेे. जे काही करायचे ते परफेक्ट, शाश्वत. कुणी काहीही म्हणो, पण जे शक्य असेल ते देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.” – शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li