जिल्ह्यात प्रतितास 150 हुन अधिक रुग्णांची पडतेय भर; 48 तासात 8 हजार बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून दरदिवशी हजारांच्या संख्येने जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर देखील वाढला आहे.

जिल्ह्यात गेल्या 48 तासात तब्बल आठ हजाराहून अधिक बाधितांची भर पडली आहे. म्हणजे जिल्ह्यात प्रतितास 150 हुन अधिक बाधितांची भर पडते असल्याचे दिसून येत आहे. ही नगरकरांसाठी मोठी धोक्याची घंटा आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात प्रशासन हतबल होत आहे, यातच बेड पाठोपाठ जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

यामुळे अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहे. यातच दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. दोन दिवसात ८ हजार ४१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

, तर दोन दिवसात ७ हजार ४९२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही दिवसांच्या अहवालात ७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात शनिवारी ३ हजार ७५३ जणांना, तर रविवारी ३ हजार ७३९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत रविवारी ३८२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७१२ इतकी झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|