मोठी बातमी ! आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

यासाठीचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल अशी माहिती राजेश रोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितली. राज्यात कोरोनाचे संकट वाढते आहे. दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील विविध खात्यात भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. परंतु, राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी केली.

100 टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाचे 12 हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी 2000 पदे अशी एकूण 16 हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू,

असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तिसरी लाट येण्याची शक्यता, त्यामुळे लवकरात लवकर भरती होणार – येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर यावेळी ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकर राबवणार असल्याचे टोपे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|