अहमदनगर जिल्ह्यातील त्या पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-संगमनेर शहरातील तीन बत्ती चौक परिसरात पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण करणाऱ्या व दगडफेक करणाऱ्या १५ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये, याकडे पोलीस लक्ष देत आहेत. शहरातील तीन बत्ती चौक परिसरात काल सायंकाळी गर्दीने फिरणाऱ्यांना पोलिसांनी अडवून जाब विचारला होता.

यावेळी काही युवकांना जोरदार प्रसाद दिला होता. यामुळे संतापलेल्या जमावाने कमल पेट्रोलपंपासमोर एकत्र येऊन पोलिसांचे वाहन अडवले होते. यातील काही जणांनी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली होती, तर काहींनी दगडफेक केली.

संतप्त जमावाचं रूप पाहून पोलिसांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जुबेर हॉटेलवाला, हॉटेलमधील काही कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख,

अरबाज साजिद शेख व इतर दहा ते पंधरा जणांविरुद्ध गु.र.नं. २१६/२०२१ नुसार भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ३३७, १४३, १४७, १८८, क्रिमिनल अमेंडमेंट कायदा १९३२चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी संगमनेरला भेट दिली. त्यांनी मुस्लिम समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन शांतता पाळण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांबद्दल काही तक्रारी करण्यात आल्या.

पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीने फिर्याद दिल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेतील आरोपींना समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे हजर करावे, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|