ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघातात मालवाहू ट्रक घुसला थेट…

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-दोन मालवाहू ट्रकांची जोराची धडक होऊन होऊन एक मालवाहू ट्रक जनरल स्टोअर्स दुकानावर, तर दुसरा मालवाहू ट्रक विजेच्या लोखंडी खांबाला धडकला.

दरम्यान हा व्हीचीत्र अपघात शनिवारी ( दि. ८ ) रोजी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव दिघेमार्गेच्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने नाशिकच्या दिशेने चालक सुवर्णसिंग (रा.ठसका, जि. कुरुक्षेत्र, हरियाना) हा मालवाहू ट्रक घेवून जात होता.

Advertisement

दरम्यान नाशिकच्या दिशेने चाललेल्या मालवाहू ट्रकला तळेगाव दिघे चौफुलीवर संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने जोराची धडक दिली.

या अपघाताच्या घटनेनंतर संगमनेरकडून आलेला मालवाहू ट्रक चौफुलीनजीकच्या रामदास दादा माने यांच्या साई जनरल स्टोअर्स दुकानास धडकला, तर नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक सदर दुकाना नजीकच्या विजेच्या खांबावर धडकला.

Advertisement

मालवाहू ट्रक दुकानास धडकल्याने दुकानाची भिंत व स्लॅब क्रॅक झाल्याचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे रामदास माने यांनी सांगितले. तसेच या अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचे व विजेच्या लोखंडी खांबाचे मोठे नुकसान झाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li