धक्कादायक ! युवकावर प्राणघातक शस्त्राने हल्ला; एकाला अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-एका युवकावर जुन्या वादाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार सोनई जवळील हनुमानवाडी येथील शनिचौकात घडला आहे.

या हल्ल्यात सागर रामचंद्र कुसळकर (रा.हनुमानवाडी शिवार) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या चौघांवर गुन्हा दाखल तर एकास अटक पोलिसांनी याप्रकरणी अमोल राजेंद्र शेजवळ, राहुल चांगदेव शिंदे, अमोल अशोक गडाख (सर्व रा. सोनई), अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव) या चौघावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल शिंदे यास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्या वादातून सागर कुसळकर या युवकावर तलवार, चाकू, कुर्‍हाड व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

या मारहाणीत कुसळकर यांच्या हातावर व पायावर खोलवर जखमा झाल्या आहेत. कुसळकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|