दारुच्या आहारी गेलेल्या मुलाची जन्मदात्यांकडून निर्घृण हत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- राहाता तालुक्यातील न. पा. वाडी येथील आपल्या दारुड्या मुलाला चक्क जन्मदात्या आई वडीलां मारहाण केली.

व या मारहाणीत अशोक गोपीनाथ धनवटे (वय 28), याचा मृत्य झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गावच्या पोलीस पाटील योगीता प्रताप धनवटे यांनी दिलेल्या

फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मयताचे वडिल गोपीनाथ बाबुराव धनवटे, आई कमल गोपीनाथ धनवटे (रा. न. पा. वाडी) चुलत भाऊ धनंजय बाबासाहेब धनवटे (रा. पिंप्रीनिर्मळ) व आत्याचा मुलगा सागर साहेबराव खरात (रा. निमगाव, राहाता) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत अशोक धनवटे हा घरातील लोकांना दारू पिऊन त्रास देतो या कारणावरून वरील आरोपींनी संगनमत करून मयतास लाकडी दांड्याने जबर मारहाण करुन त्यास जीवे ठार केले. यावरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|