आमदार मोनिका राजळे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत आहेत. ५ मे २०२१ पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

दि. २१ ते २३ एप्रिल दरम्यान कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठका कार्यक्रम तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी झालेल्या

धावपळी दरम्यान त्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने २४ एप्रिल पासून होमक्वारंटाइन झाल्या होत्या. घरी उपचार घेत असतांना

त्रास वाढल्याने त्यांना दि.४ मे रोजी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्रास कमी झाला नाही त्यामुळे दि.५ मे २०२१ रोजी त्यांना मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु असून उपचारासाठी त्यांची प्रकृती योग्य साथ देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|