जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट सर्वाधिक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दरदिवशी सरासरी चार हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून येऊ लागले आहे.

मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा फैलाव होत असला तरीही तालुक्याचा रुग्ण रिकव्हरीचा रेट सर्वाधिक आहे.

आजवर तालुक्यातील 174 गावे आणि वाड्या-वस्त्यामिळून 18 हजार 255 रुग्ण समोर आले असून त्यातील 1 हजार 559 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

तालुक्यात आजच्या स्थितीत ग्रामीण भागातील 1 हजार 242 तर शहरी भागातील 317 अशा एकूण 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 59 रुग्ण कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) तर 327 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

याशिवाय तालुक्यातील 631 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे तालुक्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 958 आहे.

तसेच तालुक्यासाठी दिलासादायकबाब म्हणजे तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा वेग आता जिल्ह्यात सर्वोच्च 90.94 टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|