पालकमंत्री म्हणतात: लोककल्याणासाठी ‘या’ आमदाराचे काम प्रेरणादायी …!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-लोकप्रतिनिधी स्वतःचा जिव धोक्यात घालून कसे काम करू शकतो ? आमदार लोकांच्या कल्याणासाठी पेटून उठला तर कसे काम उभे राहू शकते.

याचे जिवंत उदाहरण आमदार नीलेश लंके यांनी राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी आ. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील भाळवणी येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एखादा लोकप्रतिनिधी स्वतःचा जिव धोक्यात घालून किती व कसे काम करू शकतो हे आ. लंके यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.

आपली जनता दुःखी आहे, कष्टी आहे. महामारीच्या फेऱ्यात ती  अडकली आहे, तीला आधार देणं तीच्या सोबत राहून हा संसर्गजन्य आजार आहे हे माहिती असतानाही दिवस रात्र आपली सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतलं आहे.

‘लोकच नसतील तर  मी आमदार राहून उपयोग काय ?’ अशा भावना आ. लंके यांनी अतिशय निरपेक्षपणे व्यक्त केल्या. लोक या रोगाला घाबरले नाहीत, आत्मविश्‍वास जिद्दीने त्याला तोंड दिले, हसतमुखाने परिस्थितीशी मुकाबला केला तर माणसाला काही होऊ शकत नाही हे मर्म आ. लंके यांनी सांगितले.

आ. लंके यांच्या या सेंटरने ते दाखवून दिले आहे. लोकांमध्ये  आत्मविश्‍वास जागृत करणे, त्यांच्या मनात मला काहीही होणार नाही ही भावना निर्माण करणे याची या सेंटरमध्ये काळजी घेण्यात येत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.