नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाची कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील सात दुकांनावर लॉकडाऊनच्या‌ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळी ७ ते ११ या निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राहाता नगरपरिषद हद्दीत करोना या विषानुजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता नगरपरिषदेच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत.

करोना विषाणुची अँन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या नगरपरिषदेच्या वतीने केल्या जात आहेत. करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नगरपरिषद हददीत भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले, यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा चालु ठेवण्याचे आदेश दिलेले असुन

निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ आस्थापना चालु ठेवणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान आता सोमवारपासून जिल्ह्यात नियम शिथिल करण्यात येणार आहे. यामुळे आता नागरिकांसह व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.