व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने लसीकरणासाठी उडाली झुंबड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी लसीकरण हेच प्रमुख हत्यार बनले आहे. यामुळे कोरोनापासून संरक्षणासाठी नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी धावपळ करत आहे.

यातच सोमवारपासून राज्यात अनलॉकला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी व्यापाऱ्यांना लसीकरणाची सक्ती करण्यात आल्याने लसीकरण केंद्रावर व्यापाऱ्यांची लसीकरणासाठी मोठी झूबंड उडाली होती.

निगेटिव्ह अहवाल असल्यानंतरच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याने

दुकानदारांची टेस्ट साठी गर्दी झाली होती दरम्यान गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर अहमदनगर जिल्हा अखेर अनलॉक झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नियम आणि अटींसह सर्व दुकाने आणि उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मात्र दुकाने सुरू करण्यासाठी दुकानदार आणि कामगार यांची करोना चाचणी करणे बंधनकारक असल्याने राहाता शहरात चाचणीसाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळाली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने राहाता नगरपरिषदेच्या वतीने हि मोहीम राबवली जात असून व्यावसायिकांकडून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.