आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशानंतर वैद्यकीय आरोग्यअधिकाऱ्यांचे पत्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोना काळात मला दिलेली कामे मी पूर्ण केली आहेत. त्यामुळे मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही.

असे पत्र महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहे. आयुक्त गोरे यांनी मंगळवारी डॉ. बोरगे यांच्या सक्तीच्या रजेचा आदेश काढला होता.

त्यांचा अतिरिक्त पदभार डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे दिला आहे. डॉ. बोरगे यांनी आयुक्त गोरे यांच्या आदेशावर बुधवारी आपले म्हणणे मांडले.

या पात्रात डॉ.बोरगे यांनी नमूद केले आहे की , उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, सहायक आयुक्त सचिन राऊत यांना स्वतंत्र अधिकार प्रदान केलेआहेत.

त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे व त्या कर्तव्यामध्ये मला कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पूर्ण न केलेल्या बाबींसाठी मला जबाबदार धरणे योग्य ठरत नाही.

माझ्यावर ज्या जबाबदार्‍या दिल्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या आहेत. मला सोपविण्यात आलेले काम मी पूर्ण केलेले असल्याने मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही.

माझी प्रकृती ठणठणीत आहे व वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍या कर्तव्य दक्षतेने पार पाडण्यासाठी मी तयार आहे.

त्यामुळे प्रस्तुतप्रकरणी महापालिकेच्या याकामी जबाबदार असणार्‍या सर्व अधिकार्‍यांमध्ये कुठलाही भेदभाव न करता समान न्याय देऊन फक्त मला एकट्याला सक्तीच्या रजेवर पाठवू नये. असे पत्रात म्हटले आहे.