कोरोनाला हरवण्यासाठी ८ लस ठरल्या प्रभावी अस्त्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाचा वेग पाहता जगभरातून करोनारुपी राक्षसाला दूर ठेवण्यासाठी लस हवी असा एकसूर उमटला होता. शास्त्रज्ञांनी दिवसरात्र एक करून कोरोनावरील लसींचा शोध लावला.

त्यानंतर जगभरात कोरोना लसीकरण सुरु झालं आहे. विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होतं आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ८ लसींची मात्रा प्रभावी अस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत १७ कोटी ५२ लाख ६३ हजार ४१७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुळे जगात आतापर्यंत ३७ लाख ७९ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ कोटी ८७ लाख ९३ हजार ९८५ जणांनी करोनावर मात केली आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. कोरोनाला मात करण्यासाठी आठ लस प्रभावी ठरल्या आहेत.

त्यात कोविशिल्ड : ही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. या लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे.

कोव्हॅक्सिन : ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली आहे. सध्या या लसीचं २ ते १८ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

स्पुटनिक व्ही : ही रशियन बनावटीची लस आहे. करोनावरील सर्वात प्रथम मान्यता स्पुटनिक व्ही लसीला मिळाली होती. त्यानंतर रशियात लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जात आहे.

फायझर बायोएनटेक : या लसीचे दोन डोस प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

मॉडर्ना : कोरोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन : ही जगातील एकमात्र अशी लस आहे. त्याचा एक डोस पुरेसा असल्याचं सांगण्यात येत आहे.

सायनोवॅक बायोटेक: ही चीनी बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरोधात ५० टक्के प्रभावशाली असल्याचं दिसून आलं आहे.

नोवाव्हॅक्स : या लसीचे सुद्धा दोन डोस प्रभावी ठरत आहेत. ही लस ८९ टक्के कार्यशील असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.