पक्ष वैगेरे काही नाही,मला लढायचे शिकवू नका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शनिवारी खासदार संभाजीराजे यांनी कोपर्डी येथे स्मृतिस्थळाला आणि दिवंगत पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘कोपर्डी येथील भगिनीच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. तसेच ताईच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व मराठा समन्वयक उपस्थित होते.

२०१६ साली साली कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला. २०१७ साली आरोपींवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यानंतर आरोपींनी शिक्षेविरूद्ध उच्च न्यायालयात अपील केले, तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तत्काळ याविषयी उच्च न्यायालयात विशेष खंडपीठाच्या स्थापनेची मागणी केली पाहिजे. जेणेकरून सहा महिन्यांच्या आत हा निकाल लागेल. कोपर्डीतील मुलीवरील अत्याचार प्रकरणात सर्व आरोपींना शिक्षा झाली असली तरी त्यांनी उच्‍च न्‍यायालयात दाद मागितली आहे.

गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने अर्ज करून याबाबत विशेष खंडपीठाची मागणी करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी लढताना आता पुढच्या काळात पक्ष वैगेरे काही नाही, असे म्हणत मला लढायचे शिकवू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मराठा आरक्षणाविषयी ते म्हणाले, मराठा आरक्षण सविधानात्मक पातळीवर मंजूर करून घ्यायला वर्ष दीड वर्षांचा कालावधी लागेल तोवर आम्ही रस्त्यावर बसायचे का? राज्य सरकारच्या हातात असलेले विषय मार्गी लागले पाहिजेत.

सारथीला मिळणारा निधी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा पातळीवरील वसतिगृह आणि ओबीसींप्रमाणे गरीब मराठ्यांना शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.असे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.