इमामपूर घाटात मृतदेह आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत एका अज्ञात महिलेचा आज सकाळी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

याबाबत पोलिसांनी मृतदेह आढळून आलेल्या महिलेची ओळख पटविली असून नगर शहरातील पाईपलाईन रोड येथील वंदना रेपाळे असल्याचे पोलिसांनी सांगीतले असून त्या धनगरवाडी येथे शिक्षिका होत्या.

वंदना रेपाळे या गेल्या चार दिवसापासून घरातून बेपत्ता होत्या. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मीसिंग दाखल होती.

त्यांनी आत्महत्या केली असल्याची सुसाईट नोट ही त्यांच्या पर्स मध्ये सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे, असे एमआयडीसी पोलीसांनी सांगितले.