सव्वा वर्षात किती जणांनी अजितदादांचा चेहरा बघितलाय..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना संपलेला नाही, आता सगळं सुरु झालं. अजितदादांनी परवानगी दिली, चला आता काढा गाडी आणि फिरा असं करु नका. आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही.

दादा एक सेकंदही मास्क काढत नाहीत. दादाचं सगळं ऐकता तर हे का ऐकत नाही? कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी जास्त पाळा. सव्वा वर्षात किती जणांनी अजितदादांचा चेहरा बघितला आहे ?,असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी सध्याची कोरोनास्थिती तसेच मराठा भाष्य केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे ठिकठिकाणी उल्लंघन होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी कोरोना नियम पाळावेत असे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. जबाबदारीने वागा. बाहेर पढताना मास्क लावा. तसेच मास्क काढून बोलून नका,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सव्वा वर्षात दादांचा चेहरा बघितलाय का कोणी ? तसेच पुढे बोलताना त्यांनी कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाखला दिला आहे. आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही.

जो विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होईल. विनामास्कचे फोटो आले की त्याचही तिकीट कट केलं जाईल. याबाबत मी दादाला आयडिया देते. अन् जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनाही सांगते. हा नियम सगळ्या राज्यात लागू करायला लावते,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, मी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संवेदनशीलपणे पाहते. संविधानाने जे अधिकार दिलेत त्यामुळं कोणालाही रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलन करता येतात. या गोष्टीचा मला अभिमान वाटतो.