जलसंधारणाच्या कामाला मदत करणाऱ्या नानांचे आमदार पवारांनी मानले आभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही इतर विकासकामांसोबतच जलसंधारणाच्या कामाला महत्त्व दिलं आहे.

रोहित यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांची त्यांनी मदत घेतली. व मदत करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

याच अनुषंगाने रोहित पवार यांनी नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करीत, सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

कर्जत-जामखेड तालुक्यांत आमदार पवार यांच्या पुढाकाराने जलसंधारणाची कोट्यवधी रुपये अंदाजपत्रकीय खर्च असणारी कामे लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू आहेत.

यामध्ये प्रामुख्याने भारतीय जैन संघटना (बीजीएस), सकाळ रिलीफ फंड, बारामती ॲग्रो, नाम फाउंडेशन, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांसह इतर विविध संस्थांची मदत निरनिराळ्या कामांसाठी त्यांनी आजतागायत घेतली आहे.

यामध्ये सर्व ठिकाणी ‘नाम फाउंडेशन’ ही संस्था जलसंधारणाच्या कामात सर्वसाधारणपणे अग्रेसर आहे. या संस्थेची कामे राज्यभर सुरू आहेत.

कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांना त्यांची मोठी मदत मिळाली आहे. दरम्यान याच कामाची दखल घेत

आमदार रोहित पवारांनी नाम संस्थेचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते नाना पाटेकर यांची समक्ष भेट घेतली. फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत आपल्या प्रकल्पाला दिलेल्या हातभाराबद्दल त्यांचे आभार मानले.