शहरातील उड्डाणपुलाच्या कामामुळे झाला आहे वाहतूक मार्गात बदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- सध्या नगर शहरातील उड्डाण पुलाचे वेगाने सुरु असलेले काम नगरकरांना दिलासा देते आहे. शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान हे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार असल्याने त्या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस एसपीओ चौक- पत्रकार चौक- दिल्ली दरवाजा- नेप्ती नाका- टिळकरोड- सक्कर चौक या मार्गाचा वापर करतील. एसटी बसेसना मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौक दरम्यान प्रवेश बंदी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

असा असणार आहे पहिला टप्पा : 20 ते 21जून या कालावधीत अहमदनगरकडून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कोठी चौक येथून- मार्केटयार्ड भाजी मार्केट- महात्मा फुले चौक- सक्कर चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

असा असणार आहे दुसरा टप्पा : पुणेकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक 22 ते 28 जून या कालावधीत सक्कर चौक येथून टिळक रोड- आयुर्वेद कॉलेज कॉर्नर- नेप्ती नाका- दिल्ली दरवाजा- अप्पु हत्ती चौक- पत्रकार चौक- एसपीओ चौकमार्गे वळविण्यात येणार आहे.

दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरु असून 22 ते 28 जून या कालावधीत हातमपुरा ते कोठी चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

तसेच अहमदनगर शहरातील बाजारपेठेत अवजड वाहनांना चांदणी चौक ते सक्कर चौक दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.