मुळा धरणात आढळला ‘ या’ व्यक्तीचा मृतदेह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील गुलाब रानुजी मोढवे काल सकाळ पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी वावरथ-जांभळी शिवारात मुळा धरण्याच्या पाण्यात कडेला तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मयत गुलाब मोढवे हे काल सकाळी ७ वाजता कामानिमित्त बाहेर चालल्याचे सांगून घराबाहेर पडले दिवसभर त्यांचा फोन बंद होता. रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्वरित पोलीसात संपर्क साधून मिसिंग दाखल केली.

आज सकाळपासून गुलाब मोढवे बेपत्ता असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असतानाच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या जनसंपर्क मुळे जांभळी परिसरात धरणाच्या कडेला पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच धनराज गाडे यांनी वावरथचे सरपंच रामदास बाचकर व बारागाव नांदूर चे सरपंच निवृत्ती देशमुख यांना बरोबर घेऊन घटनास्थळी जाऊन खात्री केली असता

हा मृतदेह गुलाब मोढवे यांचा असल्याची खात्री केली व पोलीस स्टेशन ला माहिती दिली. दरम्यान गुलाब मोढवे हे विमा व आरटीओ प्रतिनिधी म्हणून म्हणून काम करीत असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

अत्यंत मितभाषी व सतत हसतमुख असलेल्या गुलाब मोढवे यांच्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.