हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- केडगाव येथील रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये सुरू असलेले सेंटर हे अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या परवानगीने सुरू होते ते चालवण्यासाठी कोणत्याही बनावट प्रमाणपत्रांचा वापर केलेला नाही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पूर्वग्रहदूषित कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता रेणुकामाता स्पेशलिटी हॉस्पिटल ची बदनामी सुरु केली आहे

त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये संदीप वाळुंज यांनी सांगितले. रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ला बॉम्बे नर्सिंग ॲक्टची परवानगी तसेच कोविड सेंटर मिळण्याकरिता डॉ. प्रीती हांगे यांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज दाखल केला होता परंतु लगेचच कोरोणा महामारी चे संकट सुरू झाले

त्यामुळे बॉम्बे नर्सिंग ऍक्टची परवानगी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात येताच आम्ही कोवीड केअर सेंटर हॉस्पिटल साठी महापालिकेकडे रीतसर परवानगी मागितली व महानगरपालिकेने कोविड केअर सेंटर साठी परवानगी दिली रेणुकामाता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भागीदार डॉ. प्रीती हांगे यानी पेशंटच्या उपचारा कामी येत नव्हत्या

त्या ऐवजी त्यांनी त्यांच्या वतीने डॉ. डोईफोडे यांची पूर्णवेळ नियुक्ती केली होती प्रीती हांगे यांनी भागीदारांना न कळविता 27 एप्रिल रोजी अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अर्ज देऊन रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधून बाहेर पडत आहेत असे कळवले तसेच हॉस्पिटलच्या पुढील रजिस्ट्रेशनसाठी डॉक्टर या नात्याने माझा काही संबंध नाही

असे लेखी लिहून दिली त्यानंतर रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट पेशंटच्या काळजीपोटी हॉस्पिटल प्रशासनाने डॉ.सलमान शेख यांना सदर हॉस्पिटल चालविण्याकरिता दिले. नवीन डॉक्टर यांना हॉस्पिटल चालविण्याकरिता दिल्याचा रोष मनात धरून डॉ.प्रीती हांगे यांनी रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल प्रशासनाची बदनामी सुरु केली आहे

त्यासाठी त्यांनी तथाकथित सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांच्याशी हातमिळवणी केली या दोघांनी केलेले आरोप धांदात खोटे असून चालवलेल्या बदनामीच्या संदर्भात त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहेत रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ला बॉम्बे नर्सिंग अक्टचे प्रमाणपत्र मिळालेले नाही डॉ. प्रीती हांगे व तथाकथित सामाजिक कार्यकर्ते भांबरकर यांच्यावर अहमदनगर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करावी

याची देखील आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे व त्या बोगस प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी बनावट सही असलेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर वायरल करण्यापूर्वी मध्यस्थामार्फत पैशाची मागणी केली होती

त्याची पूर्तता न झाल्याने बदनामीचे षड्यंत्र रचले आहे रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे कायदेशीर परवानगीनंतरच कोवीड केअर हॉस्पिटल म्हणून सुरु केले होते तेथे फक्त कोविड पेशंट वरच उपचार करण्यात आले

तसेच रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे पेशंट कमी झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये संदीप वाळुंज यांनी दिली आहे.