खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या पाच वर्षांत शिर्डीत रोज विश्वस्त मंडळ जाहीर होत आहे. त्याबाबत याद्याही जाहीर होत आहेत; मात्र महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते विश्वस्त मंडळ जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानवर लवकरच विश्वस्त मंडळ येणार, अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे. याबरोबरच या विश्वस्त मंडळात कोणाची वर्णी लागणार, कोण अध्यक्ष होणार, यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. विखे बोलत होते. त्यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की शिर्डी शहरातील साई मंदिर कधी उघडणार आहे, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत महाराष्ट्रातील सरकार निर्णय घेणार असले तरी हे मंदिर लवकरात लवकर उघडले जावे यासाठी पक्षपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील निवेदन देण्यात आले आहेत.

मंदिर उघडण्याच्या अगोदर शिर्डी शहरातील प्रत्येक घरातील ४५ वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला एक डोसतरी देण्यात आला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. लसीकरणासाठी लोकांना येण्या-जाण्यासाठी अडचणी येत होत्या,

त्या दूर करण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून वाढणे हाय लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय झालेला असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.