शहरातील पाणीपुरवठा चार दिवस विस्कळीत होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या महिन्याभरात नागरकरांवर अनेकदा पाणी संकट ओढावले आहे. आता पुन्हा एकदा शहर पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत.

त्यामुळे 19 ते 22 जूनपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती, महापालिका प्रशासनाने दिली. नेमके कसे असणार आहे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ? जाणून घ्या बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड,

पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर तसेच स्टेशन रोड, सारसनगर, बुरूडगाव रोड, मुकुंदनगर, केडगाव, कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास शनिवार (दि. 19) सकाळी 11 वाजेच्यानंतर पाणीपुरवठा होणार नाही.

या भागाला रविवारी (दि. 20) उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगाव, दिल्ली गेट, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड इत्यादी परिसरात रविवारी (दि. 20) पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

या भागातील पाणीपुरवठा हा सोमवारी (दि. 21) उशिराने व कमी दाबाने होईल. सर्जेपुरा, मंगलगेट, झेंडीगेट, रामचंद्र खुंट, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड,

प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागाला सोमवार (दि. 21) पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवारी (दि. 22) उशिराने व कमी दाबाने होईल, असे मनपाकडून सांगण्यात आले आहे.