खुशखबर ! पिंपळगाव खांड धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही ठिकाणी काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र नाही मात्र काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे.

यातच भंडारदरा पाणलोटात पाऊस पुन्हा कोसळू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. गुरूवारी पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने मुळा नदीतील पाणी वाढले आहे. ही नदी 450 क्युसेकने वाहती असून 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.

हे धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर असून पाणलोटातील पाऊस वाढल्यास कोतुळ पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक विस्कळीत होणार आहे. या ठिकाणी पर्यायी पुलाचे काम सुरू आहे. पण नदीला पाणी वाढल्यास हे कामही बंद होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान भंडारदरा, घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत काल गुरूवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5227 दलघफू होता. विद्युत गृह क्रमांक 1 मधून 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासांत पाणलोटात पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहिली असता यामध्ये भंडारदरा 22, घाटघर 29, पांजरे 21, रतनवाडी 23, वाकी 20. मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.