कर्नाटकला मिळाले नवे मुख्यमंत्री ! यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ बसवराज बोम्मई यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे घेतली.

राज्यपाल धावरचंद गहलोत यांनी ही शपथ दिली. या शपथग्रहण सोहळ्यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, केंद्रातील मंत्री व राज्यातील नेते उपस्थितीत होते.

भाजपच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या.

पण, येडियुरप्पांनी सोमवारी आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात बोम्मई यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर बोम्मई यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बोम्मई हे येडियुरप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहेत.

येडियुरप्पा यांच्या जवळचे आणि लिंगायत समाजाचे असल्यामुळे त्यांची वर्णी लागली. ६१ वर्षीय बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहे.