ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, तरुणावर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- देवळाली प्रवरा येथील तरूणीचा गणेगाव येथील तरूणाशी विवाह निश्चित झाला होता. नंतर दोघांचे व्हाॅट्स ॲपवर बोलणे सुरू झाले. दरम्यान दिनांक १२ जुलै रोजी तरूणाने त्या तरूणीला मोबाईलच्या माध्यमातून सांगितले कि, मी तूझ्याशी लग्न करू शकत नाही.

त्यानंतर तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील २१ वर्षीय शितल देठे या तरूणीला विवाहासाठी गणेगाव येथील सुयोग कोबरणे या तरूणाचे स्थळ आले होते.

काही दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या मध्यस्थीने मुलगी पहायचा कार्यक्रम झाला. एकमेकांची पसंती झाल्यानंतर १५ जुलै २०२१ रोजी साखरपूडा करण्याचे ठरले होते. दरम्यान मुलगा व मुलीची व्हाॅट्स ॲपवर बोलणे सुरू झाले. दिनांक १२ जुलै रोजी सायंकाळी चार ते सहा वाजे दरम्यान मुलगा व मुलीचे मोबाईलवर संभाषण झाले होते.

त्यानंतर मुलगी शितल ही नाराज झाली होती. आई वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तीने सांगीतले कि, सुभाष कोबरणे याने लग्न करण्यास नकार दिलाय. लग्नानंतर आपण खुश राहू शकत नाही. तू दुसरा मुलगा पहा. असे सुभाष बोलल्याचे शितलने सांगितले.

त्याच दिवशी रात्री दहा वाजे दरम्यान शितल हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटने बाबत सुरवातीला आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र शितलची आई सौ. रोहिणी राजेंद्र देठे यांनी दिनांक २९ जुलै रोजी राहुरी पोलिसात धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुयोग सुभाष कोबरणे राहणार गणेगाव ता. राहुरी. याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.