Red Section Separator

आज सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे चांदी स्वस्त झाली आहे. आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,700 रुपये एवढे आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,950 रुपयांवर पोहोचले आहेत.

Cream Section Separator

गुरुवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,300 इतके होते. त्यामध्ये आज तोळ्यामागे 400 रुपयांची वाढ झाली आहे.

Red Section Separator

तर गुरुवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका होता. 24 कॅरट सोन्याच्या दरात आज 440 रुपयांची वाढ होऊन ते 50,950 रुपये झाले आहेत. एकीकडे सोन्याच्या दरात आज तेजी दिसून येत आहे.

मात्र दुसरीकडे चांदीचे दर (silver rate) मात्र स्वस्त झाले आहेत. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 65,000 रुपये इतके होते. मात्र आज चांदीमध्ये किलोमागे 3 हजार 300 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 61,700 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे दिवसांतून दोनदा जाहीर होतात

Red Section Separator

दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे.

कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे. सध्या देशात सर्वाधिक महाग सोने हे चेन्नईमध्ये आहे. चेन्नईत एक तोळा 22 कॅरट सोन्यासाठी 47,860 रुपये तर प्रति तोळा 24 कॅरट सोन्यासाठी 52,210 रुपये मोजावे लागत आहेत.