या महत्वाच्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये बँकिंग नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे नियम बदलणार आहेत.
Post Bank :- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सांगितले की, आधारबेस पैसे ट्रान्स्फर प्रणालीमध्ये शुल्क लागू करण्यात येणार आहे. हे शुल्क १५ जूनपासून आकारले जाणरा आहे. दर महिन्याला तीन ट्रान्झेक्शन मोफत असणार आहेत. यानंतर प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे. मिनी स्टेटमेंटसाठी ५ रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे.
Axix Bank :- अॅक्सिस बँक १ जूनपासून मोठा बदल करणार आहे. सेव्हिंग खात्यामध्ये निम शहरी आणि ग्रामीण भागात बचत आणि वेतन खात्यांमध्ये सरासरी मासिक बॅलन्स लिमिट १५००० रुपयांवरून २५००० रुपये किंवा एक लाख रुपये करण्यात येणार आहे.