आज स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे काही कलाकार हे एकेकाळी टीव्हीसाठी अँकरिंगचं काम करायचे.
नेमके कोण आहेत 'हे' कलाकार जाणून घेऊ ...
आयुष्मान खुराना : अभिनेता आयुष्मान खुराना रोडीज विनर झाल्यानंतर बराच चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने टीव्ही शो होस्ट, आयपीएलसाठी अँकरिंगही केलं. आज आयुष्मान बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.
अपारशक्ती खुराना :अपारशक्ती खुरानाने देखील बऱ्याच टीव्ही शोसाठी अँकरिंग केलं आहे. त्यानंतर त्यानं काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारूनही बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.
रणविजय : अनेक वर्ष रोडीज हा लोकप्रिय शो होस्ट करणारा अभिनेता रणविजय आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेत.
गौरव कपूर : गौरव कपूर हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध होस्ट आहे. टीव्ही अँकरिंगमध्ये प्रसिद्धी आणि नाव कमावणाऱ्या गौरव कपूरची अभिनय कारकिर्द मात्र फ्लॉप ठरली.
सोफी चौधरी : एमटीव्हीची होस्ट सोफी चौधरीनं देखील नंतर चित्रपटसृष्टीत आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत.
पूरब कोहली : पूरब एकेकाळचा टीव्ही जगतातील अँकरिंगमधील आघाडीचा होस्ट होता. त्याने नंतर चित्रपटांमध्येही काम केलं. त्याचे काही चित्रपट हीट झाले.
मनिष पॉल : मनिष पॉल एक उत्तम अँकर मानला जातो. ‘संडे टँगो’ या शोमुळे तो चर्चेत आला होता. चित्रपटांमध्ये मनिष फार यशस्वी ठरला नाही.