Red Section Separator

दुचाकी निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त मोटरसायकल CT100 बंद केली आहे.

Cream Section Separator

कंपनी डीलरशिपने बजाज CT100 मॉडेलसाठी बुकिंग घेणे बंद केले आहे. यासोबतच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरूनही ही बाईक काढून टाकण्यात आली आहे.

Red Section Separator

बाईकचे उत्पादनही बंद करण्यात आले आहे, यामुळे आता हि लोकप्रिय दुचाकी बंद झाल्याचे संकेत मिळत आहे.

मात्र, कंपनीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही बाईक नंतर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Red Section Separator

सध्या, बजाजच्या सीटी लाइन-अपमध्ये किरकोळ विक्रीसाठी रेट्रो-प्रेरित CT 110 X ही एकमेव बाइक आहे.

बाईकची वैशिष्ट्ये : बाइकला 102 cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. या इंजिनसोबत 4-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध होता.

लाँच झाल्यापासून अनेक वर्षांमध्ये, CT100 ने परवडणारी किंमत आणि उत्तम मायलेज यासाठी नावलौकिक मिळवला आहे.

Red Section Separator

CT100 ही भारतातील विक्रीसाठी सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक होती, ज्याची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 53,696 रुपये होती.

ही बाईक चालवणाऱ्या काही वापरकर्त्यांनी 60 ते 70 किलोमीटर प्रति लीटर इतकी रिअल-लाइफ ड्रायव्हिंग रेंज रेकॉर्ड केली आहे.

लांब आसनासह आरामदायी राईड देणारी ही बाईक भारतातील प्रवासी वर्गात लोकप्रिय बाइक होती.