तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन स्मार्टफोन दरदिवशी बाजारात दाखल होत आहे.
यातच तुम्ही जर कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर हे आहेत काही चांगले पर्याय
विशेष बाबा म्हणजे अवघ्या ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये हे शानदार स्मार्टफोन खरेदी करू शकता.
JioPhone Next : या फोनमध्ये ५.४५ इंच एचडी डिस्प्ले, १३ मेगापिक्सल कॅमेरा, ३५०० एमएएच बॅटरी दिली आहे.
Lava Z21 : फोन ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो. पॉवरसाठी ३१०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. डिव्हाइस अँड्राइड ११ गो एडिशनवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे.
itel A23 Pro : फोनमध्ये ५ इंच डिस्प्ले, पॉवरसाठी २४०० एमएएचची बॅटरी, स्मार्ट फेस अनलॉक फीचर दिले आहे. फोटोग्राफीसाठी २ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. कॅमेरा ब्यूटी मोड सपोर्ट मिळतो.
स्वस्तात मस्त असलेले वरील तिन्ही स्मार्टफोनची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
अगदी ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही शानदार स्मार्टफोन खरेदी करू शकता. विशेष म्हणजे इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील हे स्मार्टफोन चांगला पर्याय आहेत.