Red Section Separator

आजकाल घराचे बांधकाम वास्तुशास्त्रानुसार केले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही गोष्टी लावल्याने सकारात्मक वातावरण राहते.

Cream Section Separator

जीवनात धन-संपत्तीची कधीच कमतरता भासू नये आणि सगळे काही एकदम मनासारखे व्हावे. दरम्यान यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत.

स्वस्तिकचे चिन्ह : शास्त्रांनुसार, स्वस्तिकचे चिन्ह घरात लावणे खूप शुभ असते. स्वस्तिकचे चिन्ह माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते.

माता लक्ष्मीचे पाय : तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी माता लक्ष्मीच्या पायांना घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे पाय असतात, त्या घरामध्ये दु:ख दारिद्र नसते.

तुळशीचे रोप : तुळशी माता लक्ष्मीचेच रूप आहे. घरासमोर तुळशीचे रोप लावल्याने घरात कधीच अशांती नांदत नाही आणि घर धन-धान्याने भरलेले राहते.

मोराचे पिस : मोराची पिसे फक्त भगवान श्री कृष्णालाच पसंत नाही तर, माता लक्ष्मी देव, इंद्रदेव यांसहीत अनेक देवांना प्रिय आहे. घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी तुम्ही देखील घरामध्ये पूजेच्या ठिकाणी मोराचे पिस जरूर ठेवा.

चांदीचा हत्ती : वास्तुशास्त्रामध्ये चांदीच्या हत्तीला शुभ मानले आहे. याचा सकारात्मक प्रभाव होतो. चांदीचा हत्ती ठेवल्याने व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते. याला घरात ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते.

Red Section Separator

वरील ५ वस्तू घरात ठेवल्याने तुमच्या घरात सुख शांती नांदेल तसेच धन-संपत्ती कधीच कमतरता भासणार नाही.