Red Section Separator

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे का? तर काळजी करू नका आज आम्ही तुमहाला यावर काही उपाय सांगणार आहोत.

Cream Section Separator

तुम्ही अगदी घरगुती उपायांनी या समस्येवर मात करू शकता. जर तुम्हाला हे उपाय माहित नसतील तर लगेच जाणून घ्या

हळद दूध – घोरण्याच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज झोपण्याच्या अर्धा तास आधी हळद मिसळलेले कोमट दूध प्या.

देशी तूप – घोरण्याच्या समस्येवर एकदम प्रभावी उपाय म्हणजे देशी तूप. यासाठी फक्त रात्री झोपायच्या आधी कोमट तूप ड्रॉपरच्या मदतीने २ थेंब नाकपुड्यांमध्ये घाला. त्यामुळॆ घोरणे अगदी काहीच दिवसात पूर्ण बंद होईल.

हिरवा वेलदोडा – दररोज झोपाण्याआधी कोमट पाण्यात हिरवा वेलदोडा अर्थात वेलची वा त्याची पूड मिसळून ते मिश्रण प्या. असे दररोज केल्यास घोरण्याची समस्या दूर होईल.

पुदिना ऑइल – झोपण्याआधी पाण्यात पुदिन्याचे काही थेंब टाकून त्याच्या गुळण्या करा. यामुळे अनुनासिक छिद्रांची सूज कमी होईल आणि श्वास घेणे सोपे होईल.

मिंट तेल - याशिवाय नाकाजवळ मिंट तेल लावल्यासही घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

Red Section Separator

ऑलिव्ह ऑइल – ऑलिव्ह ऑईलमधील घटक श्वसनाच्या मार्गातील अडचण दूर करतात. परिणामी घोरण्याची समस्या दूर होते. रात्री झोपेच्या आधी ते मधात सेवन करणे फायद्याचे ठरते.

Red Section Separator

टि ट्री ऑइल – टि ट्री ऑईलचे २ थेंब पाण्यात घालून १० मिनिटे वाफ घ्या. यामुळे बंद नाक उघडेल आणि घोरण्याची समस्या दूर होईल.