सध्या देशात पांढऱ्या फुलकोबीचं आणि ब्रोकोलीचं उत्पादन घेतलं जातं. परंतु, पांढऱ्या फुलकोबीला बाजारात योग्य भाव मिळत नाही.
मात्र, आता रंगीत फुलकोबीला योग्य भाव मिळू लागला आहे.. यातच एका शेतकऱ्याने चक्क जांभळ्या व पिवळ्या रंगाची फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील बल्ह खोऱ्यातील एका शेतकऱ्याने स्वित्झर्लंडमध्ये पिकणाऱ्या पिवळ्या आणि जांभळ्या फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे.
हे गर्भवती महिलांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स, पोषण, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि जस्त असतात, जे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात.
शेतकऱ्याला पांढऱ्या रंगाच्या फुलकोबीला केवळ 30 ते 40 रुपये किलो दर मिळत आहे, तर पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलकोबीला 60 ते 80 रुपये किलो भाव मिळत आहे.
बलह खोऱ्यातील प्रगतिशील शेतकरी दिनेश यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे सहा एकर जमिनीवर स्विस लागवड केली आहे. बियाणे परदेशी कंपनीकडून आणले होते.
युट्युब वरून या कोबी ची लागवड पद्धत आणि व्यवस्थापन याविषयी त्यांनी माहिती घेतली व यावर काम केले.
ही कोबी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पौष्टिक असण्यासोबतच ती गर्भवती महिलांसाठी देखील उपयुक्त आहे.