कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे अत्याधुनिक वाशिंग मशीन बाजारात दाखल आहे.
मात्र नुकतेच Xiaomi ने चीनमध्ये १० किलो कॅपेसिटीसह Mijia वॉशिंग अँड ड्राइंग सेट लॉन्च केले आहे.
Mijia वॉशिंग अँड ड्राइंग सेट डबल स्टरलाइजेशन आणि डबल माइट्स रिमूव्हल टेक्नोलॉजीसह येते.
यामध्ये हाय क्वालिटी लाँड्रीसाठी सिल्वर आयन स्टरलाइजेशन टेक्नोलॉजी दिली आहे. हे खासकरून कपड्यांवरील डाग साफ करते.
Mijia फ्रंट-लोडिंग १० किलो वाशिंग मशीनमध्ये २२ वॉसिंग आणि केअर ऑप्शनचा सपोर्ट मिळतो.
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे जसे की, हलके कपडे, जॅकेट, मऊ कपडे, पांढरे कपडे इत्यादी अगदी व्यवस्थित साफ होतात.
यामध्ये ४८-पोल डायरेक्ट ड्राइव्ह मोटर दिली असून, याद्वारे कपडे अगदी व्यवस्थित साफ करण्यासाठी कंट्रोल दिला आहे.
ड्रायरमध्ये कपड्यांना सुकवण्यासाठी २४ वेगवेगळे प्रकार दिले आहेत. हे कपडे व त्याच्या फॅब्रिकनुसार सुकवण्यासाठी मदत करतात.
Mijia अॅपचा वापर करून तुम्ही मशीनला कंट्रोल करू शकता. तसेच, थेट अॅपवरून कपडे धुवणे आणि सुकवणे कंट्रोल करता येईल. डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही लांबून देखील सहज वॉशिंग मशीनला कंट्रोल करू शकता.
Xiaomi Mijia वॉशिंग मशीनची किंमत ४,७९८ युआन (जवळपास ५५,८३१ रुपये) आहे. सध्या ही शानदार वॉशिंग मशीन चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
चीन व्यतिरिक्त इतर बाजारात या वॉशिंग मशीनला कधी लाँच केले जाईल, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.