बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक कृष्ण कुमार कुन्नाथ उर्फ केके यांचं काल 31 मे 22 रोजी रात्री आकस्मिक निधन झालं.
के.के कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडली आणि तो अचानक खाली कोसळला.
के.के ला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
केकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
केकेच्या मृत्यूचं खरं कारण समोर येण्यासाठी 12 वाजता त्यांचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यामुळे केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
न्यू मार्केट पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी शिफ्ट मॅनेजरची चौकशी केलीये. केके हॉटेलमध्ये कधी आला? त्याच्यासोबत कोण होतं? हॉटेलमध्ये त्याच्या खोलीत कोण आलं? याची माहिती पोलिसांना हवी आहे.
केके शेवटच्या क्षणी कोणासोबत होता आणि त्याचे काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत.
सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, असे काय झाले की या प्रसिद्ध गायकाने अचानक जगाचा निरोप घेतला. केकेचा मृत्यू सर्वांनाच धक्का बसला आहे.