ऋतुमानानुसार व्यक्तींची राहणीमान देखील बदलत असते. उन्हाळा, पावसाळा असो वा हिवाळा कपडे, राहणीमान यामध्ये बदल होत असतो.
जून महिना म्हणजेच पावसाळ्याचा महिना आला असून आता रेनकोट, छत्री यांबरोबरच चपला आणि बुटांचीही खरेदी सुरु झाली आहे.
कोणत्याही ऋतूमध्ये चांगल्या प्रकारच्या चपला वापरणे केव्हाही उत्तम. मात्र पावसाळ्यात ही काळजी जास्त प्रमाणात घ्य़ावी लागते.
अशावेळी प्रश्न पडतो तो नेमके कोणते चप्पल, शूज खरेदी करावे. काळजी करु नका, आम्ही तुम्हाला खरेदीसाठी काही टिप्स देणार आहोत.
ट्रान्सपरंट चप्पल्स तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होते.यामध्ये तुम्हाला भरपूर कलर मिळतील. कोणत्याही ड्रेसवर तुम्ही वापरु शकता.
पूर्वी गम बुटाची फॅशन होती. कालांतराने परत याची क्रेझ आली आहे. तुम्हाला बाजारात यात अनेक व्हरायटी मिळू शकतात. तसेच वेगवेगळे रंगही उपलब्ध आहेत. तुम्ही यंदाच्या पावसात हा पर्याय निवडू शकता.
ज्यांना दररोज शूज घालायची सवय आहे. त्यांना पावसाळ्यात बलेरियन्स बेस्ट पर्याय ठरु शकतो. ज्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात शुज घातल्याचा फिल येतो. याशिवाय पाय कोरडे राहण्यापासून मदत होते.
पावसाळ्यात क्रॉक्स हा उत्तम पर्याय आहे. शॉर्टस आणि शर्टवर क्रॉक्स वापरु शकता. फॅशनही होते आणि पावसाच्या पाण्यापासून बचावही होतो.
साध्या बाजारात फ्लॉरल प्रिंटेड व्हेजेसचा ट्रेंड आहे. पावसाळ्यात पेन्सिल हिल्स ऐवजी या व्हेजेसचा वापर करता येतो.