Red Section Separator

किआ ईव्ही 6 चे आज भारतात लाँचिंग होणार आहे.

Cream Section Separator

किआ ईव्ही 6चे बुकिंग 26 मे रोजी सुरू करण्यात आले होते. कंपनीने याची बुकिंग अमाउंट 3 लाख रुपये ठेवली होती.

किआच्या या कारचे केवळ 100 युनिट्स विक्रीसाठी ऑफर करण्यात येणार आहे.

या कारच्या आयातीवर जास्त प्रमाणात आयातशुल्क आकारले जाणार असल्याने ग्राहकांना या कारसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

किआ ईव्ही 6 चे हे मॉडेल ह्युंडाई मोटर ग्रुपच्या E-GMP ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित क्रॉसओवर आहे.

हा स्टायलिश क्रॉसओवर पाच रंगांमध्ये सादर केला जाणार असून त्यात, Moonscape, Snow White Pearl, Runway Red, Aurora Black Pearl आणि Yacht Blue याचा समावेश आहे.

कारमध्ये 12.3 इंच आकाराचे इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट डिस्प्ले असलेला मोठा पॅनेल दिला आहे.

Red Section Separator

रीअर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटमध्ये मागील चाकांना पॉवर देणारी एकच मोटर दिली आहे.

Red Section Separator

पावरचा विचार केल्यास एका टॅपवर 229bhp आणि 350Nm ची पॉवर जनरेट होते. कार केवळ 7.3 सेकंदात 0 ते 100kmph पर्यंत वेग पकडू शकते.

Red Section Separator

AWD किंवा ऑल व्हील ड्राईव्हमध्ये 325bhp कमाल पॉवर आणि 605Nm पीक टॉर्कसह ड्युअल मोटर सेटअप आहे, जे फक्त 5.2 सेकंदांचा वेगवान 0 ते 100kmph वेग धारण करु शकतात.

Red Section Separator

350kW DC फास्ट चार्जर वापरून 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते तर 50kW DC फास्ट चार्जरला त्यासाठी 73 मिनिटे लागतात.