तोंड येणे ही खूपच सामान्य समस्या असली तरीही त्याने भयंकर असा त्रास होतो.
हा त्रास तुम्हालाही होत असले तर जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय
एक ग्लास काेमट पाणी घ्या. त्यामध्ये एक टी स्पून मीठ घाला. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून ३ ते ४ वेळेस हा प्रयोग केला तरी हरकत नाही. पटकन आराम वाटेल.
तुळशीची ४ ते ५ वेळेस तुळशीची ५- ५ पाने बारीक चावून खा.
खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्यानेही तोंडातील जखमा कमी होतात.
इलायचीच्या दाण्याची बारीक पूड करुन त्यात मध मिसळावं व ती पेस्ट जीभेवरील फोडांवर लावावी. त्याने तोंड येण्यापासून बचाव होतो.
तोंड आल्यावर हळद फारच उपयुक्त ठरते. हळद पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.
नारळ पाणी हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर तोंड येणंही कमी करते. तोंडातील फोडांवर या पाण्याचा मारा केल्यास जळण कमी होते. तर फोड नाहीसे होण्यास मदत करते.
हिरवी कोथिंबीर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर त्याने गुळण्या कराव्यात त्याने तोंडातील फोड कमी होतात व लवकर आराम मिळतो.