'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे.
विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत.
या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत.
या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे.