Red Section Separator

दुचाकी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असलेली यामाहा लवकरच आपल्या दोन नवीन स्पोर्ट्स बाईक लॉन्च करणार आहे.

Cream Section Separator

यामाहा इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ते या वर्षाच्या शेवटापर्यंत दोन स्पोर्ट्स बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या दोन्ही बाईक्स YZF-R7 आणि MT-07 असणार आहेत. या दोन्ही बाईक ट्‌वीन सिलेंडसह उपलब्ध होणार आहेत.

या दोन्ही बाईक्सच्या लाँचिंगची माहिती यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे चेअरमन Eishin Chihana यांनी दिली आहे.

या दोन्ही बाईक्स मर्यादीत स्वरुपात उपलब्ध राहणार असून टॉप रेंज कस्टमर्ससाठी या बाईक्स भारतात उपलब्ध असणार आहेत.

यामाहाच्या या दोन्ही प्रीमियम रेंज असलेल्या बाईक्स युरो5/BS6 वर आधारीत राहणार आहे.

MT-07 आणि MT-09 एक स्ट्रीट नेकेड मॉडेल्स आहेत. हे दोन्ही मॉडेल पहिल्यापेक्षा जास्त पावरफुल आणि चांगल्या इक्विपमेंटसह उपलब्ध आहेत.

Red Section Separator

या आधी या बाइक्समध्ये 689 सीसी इंजिन लावण्यात आले होते. ते आता वाढवून 890 सीसीचे करण्यात आले आहे.

Red Section Separator

यामाहाची R7 बाइक पूर्णपणे फेयर्ड स्पोर्ट्‌स बाइक आहे. ही बाइक MT-07 प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे.

Red Section Separator

या बाइकची स्पर्धा भारतातील कावासाकी निंजा 650 आणि होंडा सीबी 650 आर सोबत होणार आहे.