आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सुचवणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुम्ही या समस्येपासून बचावताल.
तुळशीची पाने – तुळशीची पाने बारीक करून ती खाज सुटणाऱ्या भागावर चोळावी या उपायाने खाज सुटणे कमी होते.
लिंबाचा रस - लिंबाच्या रसामध्ये जैविक घटक आढळतात, ज्यामुळे खाज शांत होते. तुम्ही लिंबाचा रस थोड्याशा पाण्यात मिसळून खाज सुटलेल्या भागावर लावा. असे केल्यास तुम्हाला खूप आराम मिळेल.
बर्फाने शेकवा - जर तुम्हाला खाज येण्याची समस्या खूप त्रास देत असेल, तर तुम्ही सुती कपड्यात बर्फाचे तुकडे टाकून त्याद्वारे खाज येत असलेल्या जागेला शेकवू शकता.