बॉलिवूडमधील अभिनेत्यांची लाइफस्टाइल तसेच त्यांचे खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात चाहते नेहमीच उत्सुक असतात.
आज आम्ही तुमहाला अशाच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांची पहिली कमाईचे आकडे सांगणार आहोत.
शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. पण त्यांचा पहिला पगार फक्त 50 रुपये होता.
पंकज उधासच्या एका कॉन्सर्टमध्ये काम करताना शाहरुखला 50 रुपये पगार मिळाला, जो त्याने ट्रेनने आग्राला जाण्यासाठी खर्च केला.
हृतिक रोशनने ‘आशा’ चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून काम केले व त्याला 100 रुपये मानधन मिळाले, त्यातून त्यांनी एक खेळणी कार खरेदी केली.
सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’ चित्रपटात काम केले होते, परंतू येथे त्याची पहिली कमाई झाली नाही.
एका मुलाखतीत, अभिनेत्याने खुलासा केला होता की, ताज हॉटेलमध्ये बॅक डान्स करताना त्याला 75 रुपये मिळाले, जे त्याने केवळ फिरण्यासाठी खर्च केले.
प्रियांका चोप्रा आज करोडोंची कमाई करत असली तरी तिचा पहिला पगार होता फक्त ५ हजार रुपये, जो तिने आईच्या हातात दिला होता.
वरुण धवनने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यापूर्वी त्याने एमएडी नावाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये इंटर्नशिप केली होती, त्यासाठी त्याला 2 हजार रुपये मिळाले होते.