Red Section Separator

आपले दात स्वच्छ, पांढरेशुभ्र दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र जर दात पिवळे दिसत असतील तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो.

Cream Section Separator

मात्र, घरात अशा काही गोष्टी आहेत ज्याद्वारे तुम्ही या समस्येपासून स्वस्तात सुटका मिळवू शकता.

दातांच्या कोणत्याही समस्येवर कडूलिंब हा सर्वोत्तम उपाय आहे. कडूलिंबमुळे दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते.

कडूलिंबाचा पाला सुकवून त्याची पावडर करून त्याने दात घासा. हल्ली बाजारात तयार पूड देखील मिळते.

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते.

तीळ तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. हे टार्टर काढण्याचे काम करते. हे नैसर्गिक स्क्रबचे काम करते आणि दात पॉलिश आणि स्वच्छ करते.

Red Section Separator

टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी या दोन्हीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात आणि दात स्वच्छ करण्यासाठी वापरता येतात. दोनपैकी एक पदार्थ कापून त्याचा गर दातांवर लावा. 5 मिनिटे राहू द्या, नंतर दात स्वच्छ धुवून टाका