Red Section Separator
मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहायला अनेकांना आवडतो. मोठी स्क्रीन म्हंटली कि सिनेमा पाहण्याची मजाच काही वेगळी असते.
Cream Section Separator
मात्र आता हाच सिनेमा पाहण्याचा आनंद तुम्हाला घरबसल्या मिळवता येणार आहे.
Sony ने भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्ट टीव्ही सीरिज Bravia XR90K ला लाँच केले आहे.
कंपनीची नवीन सीरिज ७५ इंच, ६५ इंच आणि ५५ इंच मॉडेलमध्ये येते. हे सर्व टीव्ही ४के रिझॉल्यूशन डिस्प्लेसह आहे.
टीव्हीच्या ५५ इंच व्हेरिएंटची किंमत १,२३,४९० रुपये आणि ६५ इंच व्हेरिएंटची किंमत १,७०,९०० रुपये आहे.
सोनीच्या या टीव्हींना सोनी सेंटर्ससह ऑफलाइन स्टोर्स आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करू शकता.
शानदार पिक्चर क्वालिटीसह येणाऱ्या या टीव्हींमध्ये दमदार साउंडसाठी डॉल्बी एटमॉस, अकाउस्टिक मल्टी-ऑडिओ आणि ३डी सराउंड अपस्केलिंग दिले आहे.
Red Section Separator
सोनीच्या या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये ४के गेमिंग व्हिडिओसाठी HDMI २.२ कंपॅटिबिलिटीसह व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि ऑटो लो लेटेंसी मोड दिला आहे.
Red Section Separator
सोनीच्या या सर्व टीव्हीमध्ये ऑटोमॅटिक अँबिएंट ऑप्टिमाइजेशनसाठी लाइट सेंसर्स देखील दिले आहेत.
Red Section Separator
घरीच थिएटरचा आनंद मिळावा यासाठी नवीन टीव्हीमध्ये कंपनीने दोन फुल रेंज बेस-रिफ्लेक्स स्पीकर आणि दोन ट्विटर दिले आहेत. हे ४० वॉट साउंड आउटपूट देतात.
Red Section Separator
सोनीचे हे नवीन स्मार्ट टीव्ही अॅपल होम किट आणि एअरप्लेला सपोर्ट करतात. जेणेकरून, आयपॅड आणि आयफोन सारखे अॅपल डिव्हाइस टीव्हीशी कनेक्ट करता येतील.