Red Section Separator

गॅंगस्टरकडून धमकी मिळाल्यांनतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Cream Section Separator

बॉलिवूडचा दबंग खान असलेला सलमान हा बॉलिवूडमधील एक महागडा अभिनेता देखील आहे. त्याची कोट्यवधींची संपत्ती आहे.

अब्दुल राशिद सलिम सलमान खानचा जन्म डिसेंबर 1965 मध्ये झाला असून त्याने आपल्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये 80हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.

1988 मध्ये ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारून त्याने करिअरची सुरुवात केली. मात्र ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली.

सलमान हा बॉलिवूडमधला तिसरा सर्वांत श्रीमंत अभिनेता आहे. 56 वर्षीय सलमान हा त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेतो.

याशिवाय चित्रपटाच्या नफ्यातील 70 टक्के भाग हा सलमान स्वत:कडे ठेवतो. त्याची एकूण संपत्ती ही तब्बल 3000 कोटी इतकी आहे.

ॲक्शन, रोमँटिक, फॅमिली ड्रामा.. विषय कोणताही असो, ज्या चित्रपटात सलमान खान असेल, तो हिट ठरणारच असा निर्मात्यांचा विश्वास असतो.

Red Section Separator

वाँटेड, दबंग, एक था टायगर, किक, सुलतान या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले.

Red Section Separator

सलमान मोठ्या पडद्यावर जितका लोकप्रिय आहे, तितकीच छोट्या पडद्यावर त्याची क्रेझ आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं तो सूत्रसंचालन करतो.

Red Section Separator

‘बिग बॉस’च्या तेराव्या सिझनसाठी त्याने तब्बल 200 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारलं होतं.

Red Section Separator

मुंबईतील वांद्रे याठिकाणी समुद्रकिनारी सलमानचा तीन मजली बंगला आहे. ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ असं त्याचं नाव असून अनेकांसाठी हा बंगला म्हणजे जणू पर्यटन स्थळच आहे.