उन्हाळा संपत आला असून आता मान्सून येऊ लागला आहे. अनेकांनी फिरायला जाण्याचा प्लॅन देखील केला असेल.
जर तुम्हीही तुमच्या मित्र/ मैत्रिणी, फॅमिली सोबत बाहेर फिरायला जाणार असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट टुरिस्ट प्लेसेस बाबत माहिती देणार आहोत.
मसुरी : मसुरीला 'क्वीन ऑफ द हिल्स' म्हणूनही ओळखले जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे 7000 फूट उंचीवर वसलेलं हे शहर पर्यटकांसाठी जणू काही स्वर्गच म्हणावा.
नैनिताल : नैनिताल हे डोंगरांच्या मधोमध वसलेलं एक सुंदर हिल स्टेशन आहे, ज्याला 'नैनी तलाव' असंही म्हणतात. निसर्गसौंदर्य आणि तलावांच्या या शहराचं सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत असतं.
ऋषिकेश : गंगा नदीसह हिमालयाजवळीच्या अनेक प्राचीन मंदिरांसाठी ऋषिकेश जगभरात प्रसिद्ध आहे. हे एडवेंचर स्पोर्ट्ससाठी विकसित केलं गेलं आहे.
केदारनाथ : केदारनाथ हे प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ग्लेशियर आणि केदारनाथ शिखरांनी वेढलेलं हे मंदिर त्याच्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे.
बद्रीनाथ : बद्रीनाथ हे हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे, जे भगवान विष्णूला समर्पित आहे. वेदांमध्येही याचा उल्लेख आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
निसर्गाच्या प्रेमात पाडायला लावणारी ही पर्यटनस्थळे तुम्हाला नक्कीच आवडतील....