बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे येऊन गेले आहे. ज्यांची नावे आजही चर्चेत आहेत.
मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही सिनेमांची नावे सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही हसाल
राजा रानी को चाहिए पसीना : राजा राणीला घामाची गरज आहे... 1978 साली सुलेभा देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट आला होता.
सस्ती दुल्हन मंहगा दूल्हा : हे कोणत्याही भोजपुरी चित्रपटाचे शीर्षक नसून १९८६ साली आलेल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे.
अंधेरी रात में, दिया मेरे हाथ में : ही लहान मुलाने लिहिलेली कविता नसून दादा कोंडके दिग्दर्शित बॉलिवूड चित्रपट आहे. युनूस परवेझ, दादा कोंडके ते उषा चव्हाण असे स्टार्सही या चित्रपटात दिसले.
तू बाल ब्रह्मचारी मैं कन्या कुंवारी :2 जानेवारी 2004 ला आलेल्या या चित्रपटाला चांगलाच फटका बसला.
अल्लाह मेहरबान तो गधा पहलवान : हा आश्चर्यकारक शीर्षक असलेला चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये कादर खान, शक्ती कपूर यांच्यासह अनेक स्टार्स दिसले.
मुर्दे की जान खतरे में : दिग्दर्शक नवीन कुमार यांनी हा चित्रपट बनवला असून मेहमूद जूनियर ते रोमा माणिक असे कलाकार या चित्रपटात दिसले.
उधार का सिंदूर : हा बॉलीवूड चित्रपट आहे जो 1976 साली प्रदर्शित झाला होता. जितेंद्र, आशा पारीख, रीना रॉय ते अरसानी असे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळाले.